Sunday, 25 February 2018

आरक्षण ®

संविधानातील हक्कासाठी आता आम्ही लढतो आहे,
हक्क मिळावा आमुचा आम्हा आतडी आम्ही तोडतो आहे.

नका पाहु अंत आम्ही सहन केलेल्या शिवातेचा,
अन्यथा मुळापासुनी ऊखडुन टाकु अन् धडा शिकवू समतेचा.


~ शरद शिंदे
7776005177 
    = धनगर =
घुंगराची काठी आम्हां धनगराची शान,
नशीबाचे मोठे आम्ही मिळतोया मान

काय सांगू तुम्हा आम्हा धनगरांचे शौर्य,
थोर आमुचा राजा पहिला चंद्रगुप्त मौर्य.
कर्तुत्वाने पावन केली भारत भु-ची धरती,
प्रतीमा भारी शोभते संसदेच्या दारावरती.

आटकेपार फडकवले झेंडे मल्हारीच्या सेनेने,
मराठेशाहिचे सुभेदार ते, माळव्याच्या राजाने.

थोर अहिल्या मातेचा आदर्श, घेतला सर्व जगाने,
होऊन गेल्या पुण्यश्लोक त्या कर्तुत्व व वाणीने.
थोरवी त्यांची गाता गाता भरुन येयी मनाला,
प्रजेच्या सुखासाठी लेक लावली पणाला.

एकजुटीने पळवुन लावू गो-या इंग्रज साहेबांना,
हाक दिली राजा यशवंताने पन मनी भावेना राजांना.
म्हानून थोर एकटा लढला राजा जीव लावुनी पनाला,
जनक मिळाला भारतभूच्या '!अधुनिक सषत्र सेनेला.


~शरद शिदे
7776005177